बद्रीनाथ केदारनाथ प्रवासवर्णन दिवस पहिला


बद्रीनाथ केदारनाथ प्रवासवर्णन
दिवस पहिला
दिनांक 09/05/2018
गुरुदत्त ट्रॅव्हल चांदा ता नेवासा यांच्यासोबत एक धाम बद्रीनाथ सोबत केदारनाथ वैष्णोदेवी व इतर ठिकाणी जायचे होते. ट्रॅव्हल्स चे मालक श्री विजय चौधरी हे परिचयाचे होते. त्यांची दोन्ही मुले आमच्याकडे शिकले..16000 ₹ प्रत्येकी जेवण व प्रवासखर्च असे नियोजन होते.
गेले आठ दिवस जावे की न जावे असं चाललेलं त्याच कारण म्हणजे बदली. त्यात शिक्षक म्हटलं की बदलीचा धाक नव्हे टांगती तलवारच. 9 तारखेला निघायचं होत. 7 तारखेला यादी करून प्रवासासाठी लागणारे समान खरेदी केले. 8 तारखेला बॅगा भरल्या.साधारण 20 दिवसाचा प्रवास होता. आम्ही दोघे पती पत्नी जाणार होतो. 1 बॅग घ्यायची असे ठरवूनही 2 मोठ्या व 1 छोटी बॅग भरली.
सकाळी 9 तारखेला बरोबर 9 वा बस घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथून निघाली. रस्त्यात प्रवासी घेत नेवासा येथे पावन गणपती मंदिराजवळ बस थांबली. दर्शन घेऊन काही यात्रेकरूंना घेऊन बस 10 वा औरंगाबादकडे निघाली.
रस्त्याने आणखी प्रवासी घेत औरंगाबादला 12.30 वा पोहोचलो. एकूण 46 प्रवासी होते व 9 कर्मचारी होते. हळू हळू इतर प्रवासी मित्राबरोबर ओळखी व्हायला लागल्या. या सर्वात आम्ही दोघेच तरुण म्हणजे 40 व 44 चे होतो बाकी सर्व 60 च्या आसपास वयाचे होते.
2.00 वा आळंद ता अंबड येथे एक मंदिरात जेवण केले. घरून तयार करून आणलेले जेवण होते. एकमेकाला एकमेकांच्या भाज्या देत गप्पा मारत जेवण केले. अन पुढील प्रवासाला बसमध्ये बसलो. अजिंठा आल्यावर थोडे थांबून अजिंठाहुन 3.40 वा निघालो. 4.30 वा पाहुर ता जामनेर येथे पोहोचलो.
5.30
ला उसाचा रस घेतला जामनेर मध्ये पोहोचलो.
6.30
मुक्ताईनगर मध्ये पोहोचलो. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताबाई या चार भावंडात सर्वात लहान मुक्ताबाई यांची येथे समाधी, खरं तर वादळात सापडून त्या गुप्त झाल्या किंवा त्यांनी धरणीप्रवेश केला असावा अशी आख्यायिका आहे.
मुक्ताईदेवी दर्शन दर्शन घेऊन येथेच मुक्काम करायचा असे ठरले होते परंतु दर्शन वेळेत झाल्यामुळे ओंकारेश्वरला मुक्कामाला जायचे ठरले. रस्त्याने खूप खूप केळीच्या बागा दिसल्या. लहानपणी शाळेत असतानाचे गाणे आठवले
"
केळीच्या बागा मामाच्या
पिवळ्या घडांनी वाकायाच्या"
जळगावची केळी का प्रसिद्ध आहे हे तिथे गेल्यावर समजले.
मध्यप्रदेश बॉर्डरवर चेकनाका आहे तिथे केळीवाला आला, त्याच्याकडन केळे घेतली. चवदार केळी खाल्ली.
7.20
मध्यप्रदेश राज्यात प्रवेश केला. पत्नी वैशालीने प्रथमच महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात प्रवेश केला होता. त्याचाही आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
रात्री 8.45 ला एक धाब्यावर थांबून जेवण केले. आयुष्यात प्रथमच बायको वैशाली व मी एकत्र जेवलो चणा भाजी व वरन अन बाजरीची भाकरी खाल्ली.
बुऱ्हाणपूरला रस्त्याने किल्ल्याची भिंत पाहत होतो.
अन तेथून ओंकारेश्वरकडे बस निघाली. गार हवेत बसमध्ये अपॊआप झोप लागली.
*मिलिंद जामदार,*
*
घोडेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर*
*9404342216*

No comments:

Post a Comment