बद्रीनाथ
केदारनाथ प्रवासवर्णन
दिवस चौथा
दि 12 मे 2018
दिवस चौथा
दि 12 मे 2018
हॉटेल
मधल्या रुम असल्याने सकाळी साडेचारला उठून अंघोळ करून लवकर आवरले व बाहेर येऊन
थांबलो. थोड्या वेळातच चहा व बिस्कीट नाष्टा केला. ताजमहाल पाहण्याची उत्कंठा
होती. आवरून पटकन बस मध्ये बसलो. गाईड सोबत होता हे घ्या ते घ्या चाललं होतं. बळेच
एक दुकानात आग्र्याच्या पेठा घेतला.
तेथून ताजमहालकडे ताजमहाल पाहायला निघालो. याठिकाणी पार्किंग मध्ये गाडी लावून तेथील मिनीबसने प्रवास करावा, रिक्षाने जाऊ नये कारण रिक्षावाले जास्त पैसे घेऊन अलीकडे सोडतात व बरेच अंतर पायी जावे लागते तर बस ताजमहालच्या गेटपर्यंत सोडतात. बस बॅटरीवर चालणाऱ्या आहेत.
10 रुचे शूज कव्हर घेतले त्यामुळे चप्पल किंवा शूज कोठेही काढावे लागत नाही. चेकिंग करून आत सोडतात शक्यतो मोबाईल, पाण्याची बाटली व कॅमेरा सोडून सोबत काहीही घेवू नये. कारण ते सर्व काढून घेतले जाते.ताजमहाल मध्ये चेक आऊट करून आत आलो, हिरवळीने थोडं मनाला शांत वाटलं. लाल दगडात बांधलेले प्रवेशद्वार त्यातून आत प्रवेश वेगळच वाटत होतं. गेटवर फोटोग्राफरची गर्दी, त्यातला एक निवडला कारण त्याने फारच आग्रह केला. कदाचित त्याच्या आग्रहाला बळी पडलो 2 फोटोच्या बोलीवर 50 फोटो काढले. त्याच्याकडून 500 रु त 50 फोटो सॉफ्टकॉपी घेतले.
मोबाईल मध्ये खूप फोटो काढले.
माझी मुलगी दियाला व्हीडिओ कॉल करून ताजमहाल दाखवला. मनात विचार आला कबरीसाठी हे लोक इतका पैसे खर्च करत होते अन त्याच वेळेस शिवाजी महाराज स्वराज्य स्थापने साठी किल्ले उभारत होते. बाहेर आल्यावर खूप शॉपिंग केले भरपूर बार्गनिंग करून भरपूर खरेदी केली. बॅटरीवर चालणाऱ्या बसने पार्किंगला आलो. तेथे पोह्यांचा नाश्ता वाट पाहत होता.
9 वा पार्किंगमध्ये पोहे खाऊन आग्र्याच्या किल्ल्याकडे निघालो.
निघालो.

आग्र्याच्या
किल्ल्याजवळ जाताना शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहून अभिमान वाटला. गाडी
पार्क केली. ऊन प्रचंड वाढलं होत. एन्ट्री तिकीट काढून किल्ल्याच्या
प्रवेशद्वाराजवळ आलो. येथूनच शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी
दिल्या. कदाचित त्यांचे पाऊल याठिकाणी पडले असेल असे मनात आले व तेथे नतमस्तक
झालो. किल्ल्यात प्रवेश केला. गाईड घेतला,
तो
माहिती देत होता. शहाजहान राजाला राजस्थानहून सोन्याचा बाथटब दिला होता. तेथून
पुढे औरंगजेबाच्या दोन मुलींचे महाल झिनतउंनीसा व झेबूनीसा यांचे महाल व शहाजहान व
इतरांचे शयनकक्ष पाहिले. अंगुरी बाग पाहून दिवाण ए खास पहिला. तेथे शहाजहान
बादशहाची पोर्तुगालहुन आणलेले सिहासंन पाहिले. या दगडावर सोने घासून त्याची
परीक्षा घेतली जाते त्या दगडापासून बनवलेलं ते सिहासंन . मंत्री व इतरांचे महाल
पाहून दिवाण ए आम पहिला. जेथे शिवरायांनी बादशहाचा अपमान केला. त्या महालाची रचना
छान होती. जेथे औरंगजेब बसायचा त्या ठिकाणाहून संपूर्ण दरबार व हत्ती दरवाजा दिसेल
अशी रचना होती. त्या हत्ती दरवाजातून जर बादशहाला कुर्निसात केला नाही तर तेथे
त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवले जाई.
शिवाजी
महाराजांना ज्या ठिकाणी ठेवले ते ठिकाण सध्या बंद आहे, काम चालू आहे असे सांगतात. तिकडे जाऊ देत नाही. तिथूनच
महाराजां वंदन केले. हत्ती दरवाजाने बाहेर पडलो. उन्हाचा त्रास जास्त झाला.
बसकडे आलो . तेथून आता मथुरेच्या प्रवासाला निघायचे होते.

मथुरेच्या
प्रवासाला निघालो.
दीड वा मथुरेत पोहोचलो, उन्हामुळे आजारी पडलो, थंडीताप आली.गोळ्या घेऊन झोपलो, नंतर बर वाटलं,
जेवण छान होते वरण भात, कोबी, वांगे, मठ्ठा,व चपाती
मी वरणभात खाल्ला. थोडा आराम केला.
मथुरेत फिरायला गेलो. पार्किंग पासून बरेच लांब चालत जावे लागले. आत प्रवेशासाठी फारच कडक तपासणी होती. कोणत्याही प्रकारची बॅग आत नेऊ देत नाही. मथुरेत कृष्ण जन्म ठिकाण व मंदिर पाहिलं. कृष्ण जन्म ठिकाणच्या वरती मस्जिद बांधलीय. मुस्लिम राजवटीत बऱ्याच देवस्थानचा छळ झाला. रामाबरोबर कृष्णही यातून सुटलेला नाही. मंदिर सुंदर होते.
तेथून वृंदावनला निघालो
वृंदावनला पोहोचल्यावर उतरताना मला चक्कर आली. आग्र्याच्या किल्ल्यातील उन्हामुळे मला त्रास झाला होता. प्रेम मंदिर बस मधून पाहिलं होतं, आकर्षक रोषणाई केली होती. मी पार्किंग मधेच आराम केला.

पुन्हा
परतीचा प्रवास सुरु झाला. वृंदावन मधील मंदिरे बसमधून पाहत होतो. गर्दी खप जास्त
होती. उशीर झाल्याने सर्व मंदिरे पाहता आली नाही. मनात ठरवलं की एक पूर्ण दिवस
वृंदावनला द्यायचा.
मथुरेत पोहोचलो. अन जेवण न करता झोपलो.
मथुरेत पोहोचलो. अन जेवण न करता झोपलो.
*मिलिंद जामदार*
घोडेगाव ता.नेवासा, जि अहमदनगर
9404342216
घोडेगाव ता.नेवासा, जि अहमदनगर
9404342216
No comments:
Post a Comment