बद्रीनाथ
केदारनाथ प्रवासवर्णन
दिवस दुसरा
दि 10 मे 2018
आधल्या दिवशी मुक्ताईनगरहून निघून मध्ये एक धाब्यावर जेवण करून 10 मेला मध्यरात्री (सकाळी) 1.45 वा ओंकारेश्वर येथे सुखरूप पोहोचलो. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या धर्मशाळेत मुक्कामाला थांबलो.
पहाटे साडेपाचला उठलो.शेगावचे सेवेकरी तेथे दिसले. स्वच्छता खूप छान होती. सगळा परिसर सुशोभित होता. झाडे मंदिरे आश्रमशाळा सगळं कसं सुंदर होते. फ्रेश होऊन सर्वानी चहा घेतला. चहा घेऊन नर्मदा स्नानासाठी नर्मदा नदीकडे निघालो. अगदी सकाळी गेल्याने पाणी कमी होते. वरच्या बाजूला नर्मदा डॅम असल्याने पाणी वाहते होते. थंड पाण्यात मस्त डुंबलो. सकाळी 7.15 वा नर्मदा स्नान केले. तेथून झुलत्या पुलावरून ओंकारेश्वरांकडे दर्शनासाठी निघालो. झुलत्या पुलावर आल्यावर उजव्या बाजूला नर्मदेचे विशाल रूप व शहराचे दर्शन घडते. गावात शेकडो मंदिराचे कळस दिसत होते. सुर्योदयामुळे शहर पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाले होते. तेथे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. फोटोग्राफी करून दर्शन रांगेकडे वळलो.
ओंकारेश्वर दर्शन 7.35 वा घेतले.
महाराष्ट्राबाहेरच हे माझं पहिलच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक दर्शन. तेथे बाहेर आल्यावर नदीचे सौन्दर्य न्याहाळत बसलो. होड्यांची गर्दी त्यांची प्रवाशासाठीची लगबग, मंदिर डोंगरकपारिवर उंचावर आहे. नदीचे अथांग पाणी तेथे दिसत होते. घाटावर अंघोळीची गडबड पाहून पंढरपूरची वाळवंटाची आठवण झाली. सर्वांचे दर्शन होईपर्यंत मी परिसर निरीक्षण करत होतो. हेमाडपंथी पूर्ण दगडात बांधलेले मंदिर पण पत्रे निवाऱ्यासाठी टाकल्याने मंदिराची शोभा गेली होती. जवळून मंदिर दिसत नव्हते, लांबून पाहिल्यावर दिसते. झुलत्या पुलाहून पुन्हा गजानन महाराज महाराज मठाकडे आलो. आईच्या आग्रहास्तव नर्मदेचे पाणी येतांना सोबत घेतले. मठातील मंदीरे फार सुंदर होती. कृष्णाची मूर्ती खुप आवडली. तोपर्यंत जेवण तयार झाले होते. सर्व जण पंगत करून बसलो. 8.30 ला जेवण , शेवगा चपाती वरण भात, लोणचं पोटभर जेवलो. नियोजित प्रवासात उज्जैन नव्हते. परंतु पुढे उज्जैनला जायचे ठरले.
10 वा उज्जैन साठी प्रवास सुरु झाला. उष्णता खुप वाढली होती. खिडकीतून येणारी हवा सुद्धा गरम होती. ऊन जाणवत होते.
12.00 इंदोर मध्ये पोहोचलो. अहिल्याबाई होळकरांची आठवण झाली. महानगरपालिकेने रस्ते सुशोभित केलेले होते. प्रत्येक चौकात छान पुतळे होता. इंदूर शहरातून जाताना खूप छान वाटले. पावणेतीन वाजता उज्जैनला पोहोचलो. तेथे एका आश्रमशाळेत उतरलो. राधाकृष्णाचे मंदिर होते.
3.00 वा आम्ही सर्वानी चहा घेतला. 100 रु प्रतिसीट प्रमाणे उज्जैन दर्शनासाठी रिक्षा (टमटम) केल्या व उज्जैन दर्शनासाठी बाहेर पडलो. तेथे गढकलीका भर्तृहरी गुफा पाहिल्या व नवग्रहांच्या मंदिर पाहून मंगलनाथ, महाकाली मंदिर पाहिले. सांदीपनी ऋषि आश्रम पाहण्यासाठी आलो. याठिकाणी कृष्णाने सुदामा सोबत सांदीपनी ऋषींकडे 14 विद्या, 64 कला, याचे शिक्षण घेतले. आश्रम व पुष्करणी पाहून कालभैरव मंदिराकडे निघालो. रस्त्याने रिक्षावाला अनेक लहान मोठे ठिकाणे दाखवत होता. तेथून कालभैरव मंदिराकडे निघालो. दारू पिणारा देव म्हणून खूप ऐकले होते. वाटत नव्हते देव दारू पित असेल असे. पण समक्ष कालभैरव दारू पिताना पाहिला व इतर देवांचे दर्शन घेतले. रस्त्यात इथून तिथून क्षिप्रा नदी ओलांडत होतो. क्षिप्रा नदी व नदीवरील मनोहारी घाट लक्ष वेधून घेत होते. घाटांची संख्या खूप जास्त आहे. कुंभमेळ्यासाठी नदीवरील घाटाची आवश्यकता असते. याठिकाणी सिहस्थ कुंभमेळा असल्याने रस्ते व इतर सुविधा भरपूर आहेत. नंतर समजले 50 रु बसमध्ये उज्जैन शहर व मंदिराचे दर्शन घडवतात. घाटांची बांधकाम वेगळ्या पद्धतीचे वाटले. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैनचे
महाकालेश्वर दर्शन घेण्यासाठी निघालो. इथे कॅमेरा मोबाईल आत नेऊ देत नाही. इथली चप्पल सुविधा छान होती. दाराहन रांगेत बराच वेळ चप्पल घालून जाता येते. शेवटी चप्पलस्टँड आहे. येथे चप्पल ठेवली की मंदिराचा बाहेर मिळते. तशी चैनची व्यवस्था आहे.
दर्शन लांबूनच होते पण चांगल्या पद्धतीने जवळून मूर्ती व्यवस्थित दिसत नाही. म्हणून मूर्ती पाहताना दर्शनरांगेत वरच्या मजल्याहून दिसते तिथुनच पहावी व जवळ जाऊन हात जोडावे. महाकालेश्वर दर्शन सायंकाळी 6 वा घेतले इतर मंदिरे पहात पुढे निघालो.

पुढे आल्यावर खूप मोठी मूर्ती लक्ष वेधून
घेते. राजा विक्रमादित्य. त्याच्या दरबारातील नवरत्ने व सिहासन तिथे आहे. मुर्त्या
खूप आकर्षक बनवल्या आहेत. सिहासंनाचा दगड तिथे आहे. विक्रमादित्याचा काळातील
सिहासनाच्या दगडाचा काही भाग तेथे आहे. येथे छान सुशोभीकरण केले आहे.
फोटोग्राफी करून आश्रमशाळेकडे निघालो. तोपर्यन्त स्वयंपाक झालेला होता.
रात्री 7 वा जेवण केले. कृष्ण मंदिरात सायंकाळची आरती होती , आरती करतांना मन प्रसन्न झाले. 8 वा आग्र्याकडे प्रवासासाठी निघालो.
प्रवास खूप लांबचा होता. रात्रभर प्रवास करायचा होता. शाजापूर मुक्काम करायचा होता परन्तु मुक्कामाची हवी तशी व्यवस्था नसल्याने परत निघालो. पण गाडी बिघडली
रिव्हर्स गियर पडत नव्हता
ड्रायव्हरने दुरुस्त केली व रात्रभर प्रवास सुरु होता....

*मिलिंद
जामदार*
*घोडेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर*
9404342216
*घोडेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर*
9404342216
No comments:
Post a Comment